धूप आणि दीप उजाळिल्य
1142.
धूप आणि दीप उजाळिल्या ज्योति | तेव्हा ओसंडती अवघे जन ॥१॥
सोपान वटेश्वरे केला नमस्कार | उतरले पार भवसिंधू ॥२॥
घेतियेले तीर्थ तंव झाले विकळ | झांकिंयेले डोळे ब्रह्मबोधे॥३॥
निवृत्ति मुक्ताई राहिली बाहेरी | आता तुम्ही हरि सांभाळावे ॥४॥
देव ऋषीश्वर निघाले बाहेर | केला नमस्कार तामदेवे ॥५॥
