वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 5. संत एकनाथ महाराज › 1. संत एकनाथ अभंग गाथा › 1. संत एकनाथ अभंग गाथा › 63. हरिपाठ - अभंग ११२० ते ११४४

जे जे दृष्टी दिसे ते

🙏 5. संत एकनाथ महाराज · ABH-085361 · अभंग क्र. ११२३

1123.
जे जे दृष्टी दिसे ते ते हरिरुप । पुजा ध्यान जप त्यासी नाही ॥१॥
वैकुंठ कैलासी तीर्थक्षेत्रीं देव । तयाविण ठाव रिता कोठे ॥२॥
वैष्णवांचे गुह्मा मोक्षाचा एकांत । अनंताचा अंत पाहता नाही ॥३॥
आदि मध्य अंती अवघा हरि एक । एकचि अनेक एक हरि ॥४॥
एकाकार झाले जीव तोचि दोन्ही । एकाजनार्दनी ऐसे केले ॥५॥
हरिपाठ अभंग ५ वा

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग