धन्य आमुचे भाग्य परब
1128.
धन्य आमुचे भाग्य परब्रह्म संगे | साहित्य स्वआंगे करितसे ॥१॥
नाशिवंत देह जाईल की अंती | नीचाची संगति कोण काज ॥२॥
पाहिला गे माय ब्रह्मांचा आवर्तु | जीव आणि जंतु विस्तारिले ॥३॥
निवृत्ति मुक्ताई केलासे विवेक | आपपर लोक दुजे नाही ॥४॥
नामा म्हणे चित्त केले स्यिंर | देव ऋषिश्वर उठावले ॥५॥
