निवृत्ति मुक्ताईने
1141.
निवृत्ति मुक्ताईने धरियेले मौन | वटेश्वर सोपान त्यागियेला ॥ १ |
समाधि पताकांची पडली सावली | उतरले खाली योगीराज ॥२॥
पांडुरंगासंगे गेळे ऋषीश्वर | सोपान बटेश्वरी बैसविले ॥३॥
शिवाचा अवतार सद्गुरु निवृत्ति | मुक्ताबाई सखी तुम्हांपाशी |॥४॥
अंतरीचे जाणता बा पंढरीनाथ | आळे अश्रूंपात सोपानासी ॥५॥
सोपानाची बोळवण करितसे हरी | दीर्घ ध्वनी करी नामदेव ॥६॥
