कल्पनेपासुनी कल्पिला
1135.
कल्पनेपासुनी कल्पिला जो ठेवा । तेणे पडे गोंवा नेणे हरि ॥१॥
दिधल्यावांचुनि फलप्राप्ति कैंची । इच्छा कल्पनेची व्यर्थ बापा ॥२॥
इच्छावें ते जवळी हरीचे चरण । सर्व नारायण देतो तुज ॥३॥
न सुटे कल्पना अभिमानाची गांठी । घेता जन्म कोटी हरि कैंचा ॥४॥
एका जनार्दनी सांपडलीं खुण । कल्पना अभिमानी हरि झाल ॥५॥
