पिंडी देहस्थिती ब्रह
1141.
पिंडी देहस्थिती ब्रह्मांडी पसारा । हरिविण सारा व्यर्थ भ्रम ॥१॥
शुक याज्ञावल्क्या दत्त कपिल मुनी । हरीसी जाणोनी हरिच झाले ॥२॥
या रे या रे धरु हरिनाम तारुं । भवाचा सागरु भय नाही ॥३॥
साधुसंत गेले आनंदी राहिले । हरिनामें झाले कृतकृत्य ॥४॥
एका जनार्दनी मांडिले दुकान । देतो मोलविण सर्व वस्तु ॥५॥
