ज्याचे पूरवी हरी तोच
2.
ज्याचे पूरवी हरी तोचि धन्य जगी । तरला पै वेगी विठ्ठल नामे ॥१॥
हरी हाची आत्मा तत्व पै सोपे । हरतील पापे हरिनामे ॥२॥
वैकुंठींचे सुख नलगे पै चित्ती । हरी हेचि मूर्ती विठ्ठल घ्यावा ॥३॥
येचेनी स्मरणे कैवल्य साचार । सोपान विचार हरी जपे ॥४॥
