वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 1. भजनी मालिका 2026 › 1. वारकरी भजनी मालिका › 5. सर्व आरती संग्रह › 8. ग्रंथांच्या आरत्या

ग्रंथांच्या आरत्या

🙏 1. भजनी मालिका 2026 · ABH-090251 · अभंग क्र. १

1.
ग्रंथांच्या आरत्या
जयदेव जयदेव श्रीमद्भागवता आरती १

जयदेव जयदेव श्रीमद्भागवता।
श्रवणें मननें पठणें भक्ती ये हाता॥धृ॥
वेदाचें हें सार पाहे रसभरित।
दशलक्षण हें आहे लक्षीत॥ जय ॥१॥
द्वादश स्कंधामध्यें हरीची लीळा।
तिनशें पस्तिस अध्ये गाती गोपाळा॥ जय ॥२॥
अठरा सहस्र श्लोक गाती ऐकती।
ज्यासी हरीभक्ती त्यासी तत्प्राप्ती॥ जय ॥३॥
गायत्रीचें मंत्ररूप हें पाहें।
परीक्षिति-शुकसंवाद आहे॥ जय ॥४॥
भागवतरूपी देवा तूंचि अहेसी।
करूं ही आरति एका-जनार्दनासी॥ जय ॥५॥
जय हो जय श्री भगवता

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग