ज्ञानराज माझी योग्या
2.
ज्ञानराज माझी योग्यांची माउली । जेणे निगमवल्ली प्रगट केली ॥१॥
गीता अलंकार नाम ज्ञानेश्र्वारी । ब्रम्हानंद लहरी प्रगट केली ॥२॥
अध्यात्मविद्येचे दाविलेसे रुप । चैतन्याचा दीप उजळिला ॥३॥
छप्पन्न भाषेचा केलासे गौरव । भवार्णवी नाव उभारीली ॥४॥
श्रवणाचे मिषे बैसावे येऊनी । साम्राज्य भुवनी सुखी नांदे ॥५॥
नामा म्हणे ग्रंथ श्रेष्ठ ज्ञानदेवी । एक तरी ओवी अनुभवावी ॥६॥
