वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 28. संत बहिणाबाई › 1. संत बहिणाबाई अभंग गाथा › १. संत बहिणाबाई अभंग गाथा › १. संत बहिणाबाई गाथा

आऊजी कुलकर्णी लेखक त

🙏 28. संत बहिणाबाई · ABH-075948 · अभंग क्र. २

2.
आऊजी कुलकर्णी लेखक तये स्थळी ।
तयाचिये कुळी जन्म झाला ॥१॥
माता हे जानकी पिता आऊदेव ।
देवगाव नाव स्थळ त्यांचे ॥२॥
तयांचिये कुळी नाही जी संतान ।
करी जी संताना काही बाही ॥३॥
लक्षतीर्थी नित्य करुनिया स्नान ।
शिव-अनुष्ठान आरंभिले ॥४॥
कितेक दिवसात जाले स्वप्न तया ।
माझिया पितया आउजीसी ॥५॥
होईल संतान कन्या दोन पुत्र ।
ब्राह्मणे पवित्रे सांगितले ॥६॥
बहेणि म्हणे वरुषा येका मी उत्पन्न ।
नवमास पूर्ण कन्या जाले ॥७॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग