वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 1. भजनी मालिका 2026 › 1. वारकरी भजनी मालिका › 9. देव जन्माचे अभंग › 1. श्री राम जन्माचे अभंग

राजा म्हणे इच्छा तुझ

🙏 1. भजनी मालिका 2026 · ABH-073316 · अभंग क्र. २

2.
राजा म्हणे इच्छा तुझिये मानसी । डोहळे मजसी सांग आता ॥१॥
येरी म्हणे ऐसे वाटतसे जीवा । कनिष्ठासी द्यावा राज्यपट ॥२॥
ज्येष्ठासी धाडावे दुरी दिगंतरा । नये समाचारा त्याचा आम्हा ॥३॥
जनांत हे निंद्य वेदबाह्य कर्म । करिता अधर्म पाप बहु ॥४॥
माझिये मस्तकी ठेवावा हा दोष । तुम्हांकडे लेश काही नाही ॥५॥
निंदितील जन मज वाटे सुख । ऐकतांची दु :ख राया झाले ॥६॥
वृश्र्चिकाचे पेंवी तक्षक पडत । घालिताती घृत अग्निमुखी ॥७॥
ऐसी व्यथा होय नामा म्हणे त्यासी । उठिला त्वरेसी तेथोनिया ॥८॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग