वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 1. भजनी मालिका 2026 › 1. वारकरी भजनी मालिका › 15. रूपके › ३. घोंगडी भारुड

(घोंगडीची रूपके)

🙏 1. भजनी मालिका 2026 · ABH-073500 · अभंग क्र. २

2.
(घोंगडीची रूपके)
ठकिले काळा मारिली दडी । दिली कुडी टाकोनिया ॥१॥
पाघरलो बहु काळे । घोंगडे बळे सांडवले ॥धृपद॥
नये ऐसा लाग वरी । परते दुरी लपाले ॥२॥
तुका म्हणे आड सेवा । लाविला हेवा धांदली ॥३॥

अर्थ :
या देहावर काळ झडप घालणार त्यावेळी मी ब्रम्हरुप अवस्थेत लपून राहिलो व या काळाला मी अशा प्रकारे फसविले. खूप दिवसापासून देहरुपी काळी घोंगडी टाकून बसलो होतो परंतू आता ती टाकून दिली आहे. माझा शोध त्या काळाला कोठेही लागणार नाही अशा दूर ठिकाणी मी जाऊन लपलो आहे. तुकाराम महाराज म्हणतात, मी काळाला हरीसेवेची आडकाठी लावली आहे त्यामुळे त्याची धांदल उडाली आहे.

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग