वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 1. भजनी मालिका 2026 › 1. वारकरी भजनी मालिका › 5. सर्व आरती संग्रह › 12. महापुरुष आरती संग्रह

महापुरुष आरत्या

🙏 1. भजनी मालिका 2026 · ABH-090241 · अभंग क्र. १

1.
महापुरुष आरत्या

॥ जय देव, जय शिवराया ॥

जय देव, जय देव, जय शिवराया
आलो तवद्वारी आरती गाया
जय देव, जय देव, जय शिवराया,
आलो तवद्वारी आरती गाया

शिव शंकराचा, तू अवतार
हाती घेउनी, भवानी तलवार
नर राक्षसांचा, करुणी संहार
धरणी मातेचा तू , केला उद्धार
जय देव, जय देव, जय शिवराया,
आलो तवद्वारी आरती गाया……

नाथा, अनाथा. तू सामर्थ्य वंत
मावळते बळ केले जीवंत
राजा, धिराजा, तू होऊनी संत
जाणता राजा तू योगी श्रीमंत
जय देव, जय देव, जय शिवराया,
आलो तवद्वारी आरती गाया……

भक्ती, शक्ती, युक्तीचा अधिकारी
दुर्जन मर्दन, तूच, सज्जन तारी
शिव तुझे नाम हे, संकट हारी
नीत, विनीत, मी शिवबा शिवारी
जय देव, जय देव, जय शिवराया,
आलो तवद्वारी आरती गाया……

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग