वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 2. संत ज्ञानेश्वर › 1. संत ज्ञानेश्वर सार्थ अभंग गाथा › 1. उपासना कांड › १, रूप वर्णन, अभंग १ ते ५७

अनुपम्य मनोहर । कासे

🙏 2. संत ज्ञानेश्वर · ABH-075000 · अभंग क्र. २

2.
अनुपम्य मनोहर । कासे शोभे पितांबर ।
चरणी ब्रिदाचा तोडर । देखिला देवो ॥१॥
योगियांची कसवटी । दावितसे नेत्रपुटी ।
उभा भीवरेच्या तटी । देखिला देवो ॥२॥
बापरखुमादेविवरू । पुंडलिका अभयकरू ।
परब्रह्म साहाकारू । देखिला देवो ॥३॥

अर्थ :
उपमारहित अत्यंत मनोहर रूप ज्या श्रीविठ्ठलाचे आहे, ज्याच्या कमरेला पीतांबर शोभत आहे, भक्तोध्दाराचा निश्चय हेच ज्याच्या पायांतील तोडे आहेत, असा श्रीविठोबाराय मी पाहिला हो. ॥१॥ तो विठोबाराय म्हणजे योग्यांची कसवटी आहे, हे त्याच्या नेत्रावरूनच दिसते. असा चंद्रभागेच्या तटावर उभा राहिलेला देवाधिदेव मी पाहिला हो. ॥२॥ त्याचप्रमाणे पुंडलिकाला अभयकर देऊन त्याला सहाय्य करणारा असा श्रीविठोबाराय मी पाहिला हो. ॥३॥
॥जय जय ज्ञानेश्वर माऊली ॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग