वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 31. संत माणकोजी बोधले › 1. संत माणकोजी महाराज बोधले अभंग गाथा › 1. संत माणकोजी महाराज बोधले संपूर्ण अभंग गाथा › 1. संत माणकोजी महाराज बोधले एकूण अभंग 110

अरे कान्हा अरे कृष्ण

🙏 31. संत माणकोजी बोधले · ABH-080940 · अभंग क्र. २

2.
अरे कान्हा अरे कृष्णा कमलावल्लभा । काय मी वर्णू तुझ्या रुपाची शोभा ॥1॥
पाहता तुझे रुप दिसे सर्वा ठायी । भावे भक्ती करोनी शरण आलो पायी ॥2॥
आकळे तुझा महिमा न ब्रह्मादिका । साधु आणि संता नामे सापडसी एका ॥3॥
सकळ तीर्थांचे मंडण अवघे तुझे पायी । अनंत तीर्थे घडली राया तुझे ठायी ॥4॥
बोधला म्हणे चित्त राहो तुझे पायी । तुजविण सखा मज आणिक नाही ॥5॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग