झाली पाकसिध्दि वाट प
2.
झाली पाकसिध्दि वाट पाहे रखुमाई । उदक तापले डेरा चीकसा मर्दू द्या पायी ॥१॥
उठा पांडुरंगा उशीर झाला भोजनी ॥उभ्या आंचवणा गोपिका कळस घेऊनि ॥२॥
अवघ्या सावचित्त सेवेलागी सकळा । उध्दव अक्रूर आले पाचारू मूळा ॥३॥
सावरिली सेज सुमनयाति सुगंधा । रत्नदीप ताटी वाळा विडीया विनोदा ॥४॥
तुका विनंती करी पाहे पंढरीराणा । असा सावचित्त सांगे सकळ जना ॥५॥
