वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 1. भजनी मालिका 2026 › 1. वारकरी भजनी मालिका › 16. तीर्थ महात्म्य अभंग › २. पंढरीत प्रवेश करतांनाचे अभंग

वाराणशी यात्रे जाईन

🙏 1. भजनी मालिका 2026 · ABH-073522 · अभंग क्र. २

2.
वाराणशी यात्रे जाईन । प्रयाग तीर्थ पाहीन ।
त्रिवेणिये स्नान करीन । परि मी वीट नव्हेन ॥१॥
विठोबा पायीची वीट । मी कई बा होईन ॥ धृ ॥
गोदावरी यात्रे जाईन । बारा वरुषांचे फळ लाहीन ।
अब्जक तीर्थी स्नान करीन । परि मी वाट नव्हेन ॥२॥
मल्लिकार्जुन यात्रे जाईन । श्रीशैल्य शिखर पाहीन ।
पाताळगंगे स्नान करीन । परि मी वीट नव्हेन ॥३॥
मातापुर यात्रे जाईन । सह्याद्री पर्वत पाहीन ।
गहनगंगे स्नान करीन । परि मी वीट नव्हेन ॥४॥
कोल्हापूर यात्रे जाईन । महालक्ष्मी पाहीन ।
विशाळतीर्थी स्नान करीन । परि मी वीट नव्हेन ॥५॥
एका अंगुष्ठी तप करीन । पृथ्वीपात्रचि लाहीन ।
देह कर्वती देईन । परि मी वीट नव्हेन ॥६॥
बहुता पुण्यांच्या सायासी । चरण जोडले विटेसी ।
निवृत्तिदासु म्हणे परियेसी । परि मी वीट नव्हेन ॥७॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग