कृत त्रेता द्वापार क
2.
कृत त्रेता द्वापार कली । ऐसा चौयुगांचा मेळी ।
ते महायुग शब्द आढळी । वेदांत शास्त्री ॥१॥
ऐसा ब्रह्मयाचा दिनांतर । तैसीच रात्र एक सहस्त्र ।
तिसा दिवसांचा प्रखर । एक मास ॥२॥
ऐसे बारामास । त्याचे एक वरुष ।
शतभरी आयुष्य । ब्रह्मयाचे ॥३॥
ऐसा ब्रह्मयाचा दिनांत । शत वरुष गणित ।
ज्या प्रळयी पोहत । मार्कंडेय उदकी ॥४॥
ऐसी अठ्ठाविस युगे जाण । पंढरपूरासी झाली पूर्ण ।
जो की ब्रह्मयाचा दिन । प्रळय काळ ॥५॥
नामा म्हणे पंढरीची संख्या । सांगितली संत महंत लोका ।
लसूनि पादुका । विठोबाच्या ॥६॥
