वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 1. भजनी मालिका 2026 › 1. वारकरी भजनी मालिका › 10. निवडक अभंग › 4. संत एकनाथ निवडक अभंग

जो निर्गुण निराभास ।

🙏 1. भजनी मालिका 2026 · ABH-072454 · अभंग क्र. २

2.
जो निर्गुण निराभास । जेथुनि उद्‍भव शबल ब्रम्हास ।
आदिनारायण म्हणती ज्यास । तो सर्वास आदिगुरु ॥१॥
तयाचा ब्रम्हा अनुग्रहीत । ब्रम्हा अत्रीस उपदेशीत ।
अत्री पाद प्रसादीत । श्री अवधूत दत्तात्रय ॥२॥
दत्तत्रय परंपरा । सहस्त्रार्जुन यदु दुसरा ।
जनार्दन शिष्य तिसरा परंपरा । केला खरा कलियुगी ॥३॥
जनार्दन कृपेस्तव जाण । समूळ निरसले भवबंधन ।
एका जनार्दनी शरण । झाली संपूर्ण परंपरा ॥४॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग