नित्य नाम वाचे तोचि
2.
नित्य नाम वाचे तोचि एक धन्य । त्याचे शुद्ध पुण्य इये जनी ॥१॥
रामनाम कीर्ती नित्यमंत्र वाचे । दहन पापाचे एका नामे ॥२॥
ऐसा तो नित्यता पढे तत्वनाम । नाही तयासम दुजे कोणी ॥३॥
निवृत्ती अव्यक्त रामनाम जपे । नित्यता तै सोपे रामनाम ॥४॥
