नको नको मना गुंतु मा
2.
नको नको मना गुंतु मायाजाळी । काळ आला जवळी ग्रासावया ॥१॥
काळाची ही उडी पडेल बा जेव्हा । सोडविना तेव्हा मायबाप ॥२॥
सोडविना बंधु पाठिची बहिण । शेजेची कामीन दुर राहे ॥३॥
सोडविना राजा देशीचा चौधरी । आणिक सोइरी भली भली ॥४॥
तुका म्हणे तुला सोडविना कोणी । एका चक्रपाणिवांचूनिया ॥५॥
