अगाध हे कीर्ति विठ्
2.
अगाध हे कीर्ति विठ्ठला तुमची । महिमा आणिकाची काय सांगो ॥१॥
पुराणे भागली नेति नेति शब्द । श्रुतीचा अनुवाद खुंटलासे ॥२॥
शेषादिका जेथे न कळेचि अंत । तेथे मी पतित काय वानू ॥३॥
चोखा म्हणे माझा नाही अधिकार । कैसा हा विचार होईल नेणो ॥४॥
