वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 1. भजनी मालिका 2026 › 1. वारकरी भजनी मालिका › 15. रूपके

झाली संध्या संदेह मा

🙏 1. भजनी मालिका 2026 · ABH-090288 · अभंग क्र. १

1.
झाली संध्या संदेह माझा गेला । आत्माराम ह्रदयीं शेजे आला ॥धृ॥ गुरुकृपा निर्मळ भागिरथी । शांति क्षमा यमुना सरस्वती । असीपदें एकत्र जेथे होती । स्वानुभव स्नान हे मुक्तास्थिती ॥१॥ सद्‍बुद्धीचे घालुनि शुद्धासन । वरी सद्‍गुरुची दया परिपूर्ण । शमदम विभूति चर्चुनी जाण । वाचे उच्चारी केश‍व नारायण ॥२॥ बोध पुत्र निर्माण झाला जेव्हा । ममता म्हातारी मरोनि गेली तेव्हा । भक्ति बहीण धावूनि आली गांवा । आता संध्या कैसी मी करू केव्हा ॥३॥ सहज कर्मे झालीं ती ब्रह्मार्पण । जन नोहे हा अवघा जनार्दन । ऐसे ऐकता निवती साधुजन । एका जनार्दनी बाणली निज खुण ॥४॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग