ज्ञानदेव माझी योग्या
2.
ज्ञानदेव माझी योग्यांची माऊली । जेणे निगमवल्ली प्रकट केली ॥१॥
गीता अलंकार नाम ज्ञानेश्वरी । ब्रह्मानंद लहरी प्रकट केली ॥२॥
अध्यात्मविद्येचे दाविलेसे रूप । चैंतन्याचा दीप उजळिला ॥३॥
छप्पन भाषेचा केलासे गौरव । भवार्णवीं नाव उभारीली ।।४॥
श्रवणाचे मिषे बैसावें येऊनी । साम्राज्य भुवनीं सुखी नांदे ॥५॥
नामा म्हणे ग्रंथ श्रेष्ठ ज्ञानदेव । एकतरी ओवी अनुभवावी ॥६॥
