निरंजन वना गेलिये सा
2.
निरंजन वना गेलिये साजणी । तेथे निर्गुणे माझ्या मनी वेधियेले ॥१॥
सुखाची अति प्रीति जहाली गे ब्रह्मी । श्रीगुरु निवृत्ति मुनी जाहले गे माय ॥२॥
बापरखुमादेविवरु विठ्ठलु सहज सांवला । निर्गुण दाविला विसुरा गे माये ॥३॥