म्हणसी कडवसा गे माये
254.
म्हणसी कडवसा गे मायेचिया बैसा ।
मायाचि नाही मिथ्यापणे निजबोधप्रकाशा ॥१॥
लपो कोणीकडे गे सांग बाई निवाडे ।
अविदयाही म्हणसी तरी ते न दिसे निवाडे ॥२॥
कैचे मी माझे हे गे झांकोळिले तेजे ।
अवघी आत्मराजे माझया उजळी निजे ॥३॥
निळा म्हणे नुरे गे लपणेचि वोंसरे ।
याचिया प्रकाशे उजळले दरे खोरे ॥४॥
