फुलाचे अंगी सुवास अस
257.
फुलाचे अंगी सुवास असे । फूल वाळलिया सुवास नासे ॥१॥
मृत्तिकेचे घट केले नानापरी । नाव ठेविले रांझण माथण घागरी ॥२॥
विराली मृत्तिका फुटले घट । प्राणी का फुकट शोक करी ॥३॥
चोखा म्हणे ऐसे मृगजळ पाही । विवेकी तिये ठायी न गुंतेची ॥४॥
