कोणासी म्हणावे निश्च
253.
कोणासी म्हणावे निश्चित ।
पहावाहा अर्थ विचारूनी ॥१॥
मग ते वंदावे भजानवे सप्रेमे ।
मोक्षदानी नेमे वेदवाक्य ॥२॥
जीव, देह, जाति, वर्ण, कर्म, धर्म ।
पहावे हे वर्म शोधूनिया ॥३॥
बहेणि म्हणे ज्ञान पांडित्य ब्राह्मण ।
विवेके करोनी पहा आधी ॥४॥
