वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 16. संत जनाबाई › 1. संत जनाबाई गाथा 350 अभंग › 1. संत जनाबाई अभंग गाथा › 11. उपदेश

कीर्तनासी जाता मार्ग

🙏 16. संत जनाबाई · ABH-074016 · अभंग क्र. २५७

257.
कीर्तनासी जाता मार्गी टाकी पाय । अमर देह होय कळे त्यासी ॥1॥
वाराणसी धरोनि पदरी । चाललीसे नारी दोहीकडे ॥3॥
आमच्या बापाची ऐकावया कीर्ति । जाऊ म्हणोन घेती ऐक्य कधी ॥4॥
कीर्तनासी जावे कैसे कोणेपरी । असू द्या अंतरी गोष्‍ट हित ॥5॥
वर्‍हाडी धावे जैसा प्रयोजनी । तान्हेले ते पाणी पुसावया ॥6॥
व्याकुळ ते एक चुकले बाळक । त्या धावे शोके हाका मारी ॥7॥
अशी कथे जाता गंगा त्या चरणी । म्हणे दासी जनी भाक मानी ॥8॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग