येत येत उभा राजबिदी
249.
येत येत उभा राजबिदी । सर्वे चाले गोपाळांची मांदी । नारी पाहती उभया बिदी । एकीच्या धरूनि बाहुवा खांदी ॥१॥
हरिहरनंदना साद्दश्य लोचना । डोळ्या वेगळा न बा जासी कान्हा ।
अरे कान्हा मनमोहना । गोपी भुलल्या तुझिया गुणा ॥ध्रु०॥
चतुर्वेद नागवी भाट सांगाते । उभया वर्णिता रामकृष्णाते ।
श्रुति स्मृति विद्यावंते । जय जय म्हणती कृपानिधिते ॥२॥
येत येत उभा रहात । सुदाम्याच्या खांद्यावरी हात ।
समद्दष्टी गोपिका न्याहाळीत । चैतन्य चोरोनि आनंदे डुल्लत ॥३॥
ऐसा कृष्ण सौभाग्यसुंदर । लावण्य गुण रत्नाकर ।
विष्णुदास नामयाचा दातार । भक्ति भावे वोळंगा सारंगधर ॥४॥
