नाना व्रत तप दान । म
254.
नाना व्रत तप दान । मुखी हरी स्मरण ॥1॥
येथे असो द्यावा भाव । पुरवी अंतरीचे देव ॥2॥
हाचि विश्वास धरुनी । कृपा करील चक्रपाणी ॥3॥
भक्तिभाव ज्याचा पुरा । त्यासी धावतो सामोरा ॥4॥
लक्ष लावा पायांपाशी । म्हणे नामयाची दासी ॥5॥