दु:खरू प देह दु:खाचा
249.
दु:खरू प देह दु:खाचा संसार । सुखाचा विचार नाही कोठे ॥१॥
कन्या पुत्रबाळे सुखाचे सांगाती । दु:ख होता जाती आपोआप ॥२॥
सोयरे धायरे कवणाचे कवण । अवघा वाटे शीण मना माझ्या ॥३॥
चोखा म्हणे अहो पंढरीनिवासा । सोडवी भवपाशा पासोनिया ॥४॥
