नामाचे चिंतन प्रगट प
248.
नामाचे चिंतन प्रगट पसारा । असाल त करा जेथे जेथे ॥१॥
सोडवील माझा स्वामी निश्र्येसि । प्रतिज्ञा हे दासी केली आम्ही ॥२॥
गुण दोष नाही पहात कीर्तनी । प्रेमे चक्रपाणी वश्य होय ॥३॥
तुका म्हणे कडू वाटतो प्रापंच । रोकडे रोमांच कंठ दाटे ॥४॥
