दु:खाची निवृत्ति सुख
257.
दु:खाची निवृत्ति सुखाचे ते सुख | पाहता श्रीमुख गोविंदाचे ॥१॥
रंगणी रांगत गुलगुल बोलत | असुर रूळत चरणतळी ॥२॥
नामा म्हणे हाती लोणियाचा उंडा | गौळणी त्या तोंडा भुललिया ॥३॥