काम लागे कृष्णापाठी
248.
काम लागे कृष्णापाठी । केली स्मशानाची गाठी ॥1॥
परम कामे भुलविला । कृष्ण स्मशानासी नेला ॥2॥
भुलविला मनी । रुद्र पाहोनी मोहनी ॥3॥
कन्येचिये पाठी । ब्रम्ह लागे हतवटी ॥4॥
काम पराशरालागी । ज्ञानासी लाविली आगी ॥5॥
काम गेला शुकापाठी । म्हणे जनी मारी काठी ॥6॥
