खेळता सांवळा गडियांस
254.
खेळता सांवळा गडियांसी म्हणे । खेळ तो पुरे गाई जमा करणे ॥१॥
आपुलाल्या आपण वळाव्या गाई । नवल तो तेणे खेळ सांडावया भाई ॥२॥
धांवती संवगडी पाठोंपाठ लवलाह्मा । गुंतल्या त्या गाई वळती न येती वळाया ॥३॥
येवोनि दीन मुख करिती हरिपुढें । एका जनार्दनी तया पाहता प्रेम चढें ॥४॥
