वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 6. संत निळोबाराय › 1. संत निळोबाराय अभंग गाथा › १. संत निळोबा गाथा भाग १ › ७. खेळ

तरिच बरवंटा गे लई लई

🙏 6. संत निळोबाराय · ABH-089745 · अभंग क्र. २४८

248.
तरिच बरवंटा गे लई लई लखोटा ।
फिरोनिया नवजसी यमपंथे वाटा ॥१॥
लखोटयाच्या भारे गे नवजाये चाचरी ।
धरुनिया तारा निजवृत्ति हे सावरी ॥२॥
हरीचिया छंदे गे डोल ब्रम्हानंदे ।
घालूनिया पायातळी इंद्रचंद्रपदे ॥३॥
निळा म्हणे खेळी गे जोडी वनमाळी ।
नाहिं तरि मायामोहे पडशील जाळी ॥४॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग