षड्चक्री कुंभार घडीत
257.
षड्चक्री कुंभार घडीतसे माती । तैसे आम्हा किती चाळविसी ॥
रातीचा दिवसु की दिवसाची राती । वावधाणी वाती लावितोसी ॥
ज्ञानदेव म्हणे अवघेचि मृगजळ । सांडुनि पाल्हाळ नित्य ध्यांई ॥
अर्थ :
कुंभार ज्याप्रमाणे घट करण्याच्या उद्देशाने चाक फिरवितो त्याप्रमाणे तू आम्हाला किती फिरवतोस. दिवस संपला की रात्र व रात्र संपली की दिवस अशा ह्या संसार चक्रांत तुझ्या प्राप्तीची इच्छा करणे म्हणजे वावटळीत दिवा लावण्याचा प्रयत्न करण्यासारखे आहे. हा सर्व संसार मृगजळासारखा असुन ते पाल्हाळ टाकुन नित्य त्या परमात्म्याचे ध्यान कर असे माऊली ज्ञानेश्वर महाराज सांगतात.
