वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 4. संत नामदेव › 1. संत नामदेव अभंग गाथा › १. संत नामदेव गाथा :- भाग १ › 125. गौळणी

ध्यानी घ्याता मनी हा

🙏 4. संत नामदेव · ABH-083053 · अभंग क्र. २५४

254.
ध्यानी घ्याता मनी हाचि येऊती बसे | गीती गाता वसे हृदयकमळी ॥१॥
बाहेरी भीतरी वेधिले वो येणे | रुक्मिणीरमणे पांडुरंगे ॥२॥
याविण दुसरे मज कांहींच नाठवे | लागलीसे सवे गोपाळाची ॥३॥
भोगिता या जीवा कांहींच नाठवे | लागलीसे सवे गोपाळाची ॥४॥
ऐसा अखंड विदेही लौकिकाविरहित | नामा जीवन्मुक्त होउनी ठेला ॥५॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग