सोपे वर्म आम्हा सांग
249.
सोपे वर्म आम्हा सांगितले संती । टाळ दिंडी हाती घेउनी नाचा ॥१॥
समाधीचे सुख सांडा ओवाळूनी । ऐसा या कीर्तनी ब्रम्हरस ॥२॥
पुढती घडे चढते सेवन आगळे भक्ती भाग्य बळे निर्भरता ॥३॥
उपजोंची मये संदेह चित्तासी । मुक्ति चारी दासी हरिदासांच्या ॥४॥
तुका म्हणे मन पावोनी विश्रांती । त्रिवीध नासती ताप क्षणे ॥५॥
