आजी कांहो कृष्ण वर्ज
247.
आजी कांहो कृष्ण वर्जिली यमुना । बाऊ तो जाणा कोठोनि आला ॥१॥
कैसा आहे बाहु पाहिन तयाते । म्हणोनि त्वरित उठिलासे ॥२॥
वारितां वारितां पेंदा पै गेला । पहातसे उगला यमुनेंत ॥३॥
बाऊ तो न दिसे कोठे खल्लाळ वाजत । पेंदा तया म्हणत क्रोधयुक्त ॥४॥
म्हणतसे पेंदा यमुनेसी जाण । स्त्री तू होऊन हुंबरी घेसी ॥५॥
मी कृष्णदास घेसी तुं हुबरी । तुज निर्धारी बळ बहु ॥६॥
मी काय निर्बळ घेसी तुं हुबरी । आतांची निर्धारी पाहे माझे ॥७॥
म्हणोनिया पेंदा तेथेंची बैसला । हुबरीं तो तयाला घालीतसे ॥८॥
पेंदा का नये काय जाहलें त्याला । कृष्णे पाठविला दुजा एक ॥९॥
तोही मीनला तयांसी तत्काळ । गडी तो सकळ आले तेथे ॥१०॥
उरलेसे दोघे कृष्ण आणि राम । गुंतले सकाम गडी तेथे ॥११॥
काय जाहलें म्हणोनि आले उभयंता । पाहुनी तत्त्वता हांसताती ॥१२॥
सावध करिता न होती सावध । लागलासे छंद घुमरीचा ॥१३॥
एका जनार्दनी कौतुके कान्हया । आली असे दया भक्तांची ते ॥१४॥
