पाडूनि लगोया चेंडुवा
249.
पाडूनि लगोया चेंडुवाच्या एका घाये ।
सुखी खेळे खेळ साह्य करुनि हरीचे पाय ॥१॥
खेळे ऐसा खेळ । मनी धरुनि घननीळ ॥२॥
उडोनिया जाता चेंडु न सांभाळे उसी ।
धावताचि मरती पोरे होती कासाविसी ॥३॥
निळा म्हणे झेलूनिया घेई वरिच्यावरी ।
एकविध भावे शरण जाऊनिया हरी ॥४॥
