चहू वर्णांमाजी वरिष्
252.
चहू वर्णांमाजी वरिष्ठ ब्राह्मण ।
समीपता जाण मुक्ती त्यासी ॥१॥
ब्रह्मची ब्राह्मण बोलताती श्रुती ।
वचनासी वंदिती लोकत्रय ॥२॥
ब्राह्मण जालिया नाही अधोगति ।
देव सर्व ध्याती ब्राह्मणासी ॥३॥
बहेणि म्हणे जे हे गायत्रीचे स्थळ ।
राहावया केवळ देह ज्याचे ॥४॥
