वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 16. संत जनाबाई › 1. संत जनाबाई गाथा 350 अभंग › 1. संत जनाबाई अभंग गाथा › 11. उपदेश

संसारी निधान लाधले ज

🙏 16. संत जनाबाई · ABH-074019 · अभंग क्र. २५६

256.
संसारी निधान लाधले जना । सद्‌गुरुचरणा सेवी बापा ॥1॥
कायावाचामने तयास देवावी । वस्तु मागून घ्यावी अगोचर ॥2॥
ते गोचर नव्हे जाण गुरुकृपेवीण । एर्‍हवी ते आपणा माजी आहे ॥3॥
असता सम्यक परि जना चुकामुक । भुलली निष्‍टंक मंत्रतंत्रे ॥4॥
माळ वेष्‍टण करी टापोर घेती शिरी । नेम अष्‍टोत्तरी करिताती ॥5॥
जो माळ करविता वाचेसि वदविता । तया ह्रुदयस्था नेणे कोणी ॥6॥
सोहं आत्मा प्रगट जो दाखवी वाट । सद्रुरुवरिष्‍ठ तोचि जाणा ॥7॥
तया उत्तीर्णता व्हावया पदार्था । न देखो सर्वथा जनी म्हणे ॥8॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग