ब्राह्मणाचे मुखे तृप
248.
ब्राह्मणाचे मुखे तृप्त होय देव ।
पहा अनुभव रोकडा हा ॥१॥
यालागी ब्राह्मण वंदावे मस्तकी ।
शास्त्रे समस्त की बोलताती ॥२॥
ब्राह्मणाचे मंत्रे पाषाणी प्रतिष्ठा ।
धरलिया निष्ठा प्रगटे देव ॥३॥
बहेणि म्हणे देव कलियुगी हेचि ।
ऐसी हे वेदांची असे साक्ष ॥४॥
