वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 6. संत निळोबाराय › 1. संत निळोबाराय अभंग गाथा › १. संत निळोबा गाथा भाग १ › ७. खेळ

विटि दांडू भला रे तर

🙏 6. संत निळोबाराय · ABH-089741 · अभंग क्र. २५५

255.
विटि दांडू भला रे तरीच मारी टोला ।
नाही तरि डाव घेता धावडिती मुला ॥१॥
सावधान पाहे रे हरीचि चित्ती ध्याये ।
न राहोनि निदसुरा खेळाच्या प्रवाहे ॥२॥
हाणे नीट दांडू रे नाही तरी नाडू ।
वाउगाचि टोला होता पावसील दंडू ॥३॥
निळा म्हणे हरिमुखे म्हणताचि सुनेति ।
न चुके जो त्वरा करी तोचि पावे कीर्ति ॥४॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग