वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 5. संत एकनाथ महाराज › 1. संत एकनाथ अभंग गाथा › 1. संत एकनाथ अभंग गाथा › 39. काला - अभंग २३२ ते २६३

गोपाळ म्हणती कान्हा

🙏 5. संत एकनाथ महाराज · ABH-084749 · अभंग क्र. २५५

255.
गोपाळ म्हणती कान्हा । सांभाळी आपुल्या गोधळा ।
पळतां सैराट धांवती राना । गेल्या ठेल्या त्या तुम्ही जाणा ॥१॥
कान्होबा पुरे पुरे तुझी गडी । आम्हा गाईनें केली ओढाओढी ॥धृ.॥
तू बैससी टेकावरी । आम्ही श्रमतो वेरझारीं ।
ऐसे कैसे तुझे मुरारी । आपुलीं गोधनें जतन करी ॥२॥
तुझ्या न लगती आम्हा गाई । तुझी संगती पुरे भाई ।
जरी कोपेल तुझी आई । तरी करील आमचें काई रे ॥३॥
तुझी गोधनें सैराटें । दाहीं पळतां दाही वाटे ।
वळितां कष्ट होताती मोठे । ठेचा लागुनी फुटली । बोटे ॥४॥
पैल श्रवणीं पाहे गाये । ते साद होये तिकडे जाये ।
उभी क्षणभरीं न राहे । वळितां जाती आमुचे पाय ॥५॥
पैल सावळीं डोळे सुटी । देखोनि धांवे हिरवटी ।
वळीतां धाप न साहे पोटी । ती तु सांभाळी जगजेठी ॥६॥
पैले हुंगी कैसा सुजाण । स्वाद घे परी न खाये तृण ।
इसी हिंडवया थोडकें रान । वळीतां जाती आमुचे प्राण ॥७॥
पैल चोरटी रसाळ रंगी । कळप सांडोनी वाढे वेगी ।
वळितां न वळे ती आम्हालांगीं । तुझी संगत नको वेंगी ॥८॥
पैल सर्वांग सुकुमार मोठी । चहूंकडे ती धांवत खोटीं ।
मऊ रान देखोनिया अंग लोटी । तिसी वळित जालो हिंपुटी ॥९॥
पैल लोभिष्ट हुंबरे कैशी । उगा न राहे हुंबरे द्वेषी ।
वळीतस न वळे ती आम्हांसी । ती तु सांभाळी हृषीकेशी ॥१०॥
पैल हाताळ वोढाळ येकी । तेणे पाते गुड हाकी ।
ऐशी खट्याळ नाही आणिका । वळितां वळित्या घेती निकी ॥११॥
पैल पाय करिती भारी । उभी न राहे क्षणभरीं ।
वळतां शिणलों बहु मुरारी । ते तु आपुलें जतन करी ॥१२॥
पैल पोटफुगी खादाड । कैशी खाउनी हागे बाड ।
धुतां कधींच नव्हे धड । तुझी गोधने न लगती गोड ॥१३॥
पैल मुतरीं मुंजी लांडी । कैशी सांचलीं घेत होडी ।
धांवे जेथे गोड लागे तोंडीं । वळतां पडती आमुची मुरकुंडी ॥१४॥
पैल मनमोहन सुंदर । कोणे काळी नव्हे स्थिर ।
इसी हिंदावया थोर वावर । हांव धरुनी धावती फार ॥१५॥
ऐसी गोधनें आमुच्या माथा । घालूं पहातोसी अनंता ।
एका जनार्दनी विनवितं कृपा आली आलिंगी निजभक्ता ॥१६॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग