शरीर हे जायाचे नश्वर
253.
शरीर हे जायाचे नश्वर आणिकांचे । म्हणाल जरी त्याचे काय काज ॥1॥
आंबरसे चोखिला बिजसाले सांडिला । पुढे तेणे उभविला दुजा एकू ॥2॥
समूळ साल माया सांडूनिया दिजे । परि अहंबीज जतन करा ॥3॥
ते बीज भाजोनि करा ओंवाळणी । संतांचे चरणी समूळ देह ॥4॥
पुढे त्या बीजांची न करावी दुराशा । न धरावी आशा पुढिलांची ॥5॥
आहे नाही देह धरी ऐसा भाव । म्हणे जनी देव सहज होसी ॥6॥
