ध्यान सांवळे गोकुळीं
252.
ध्यान सांवळे गोकुळींचे । धांव पाव वेगी हरी सांवळिया ॥ध्रु०॥
सांवळीसी आंगी उटी । सांवळी कस्तुरी लल्लाटी ।
सांवळीसी कांसे कासियला कटी । गोवळिया ॥१॥
सांवळीसी तनु वरवी । सांवळे वृंदावन मिरवी ।
सांवळ्याशा तुळसी कानी । मंजुरिया कोंवळिया ॥२॥
संवळीसी कंठी माळा । सांवळे ह्रदयी पदक विशाळा ।
सांवळ्याशा गोपी केल्या ओंवळ्या । गोंवळिया ॥३॥
सांवाळिसी हाती काठी । सांवळासा कांबळा पाठी ।
नामयाचा स्वामी गायी राखी । धवळ्या आणि पिंवळ्या ॥४॥
