हरी म्हणता गती पतके
251.
हरी म्हणता गती पतके नसती । कळी काळ कांपती हरी म्हणता ॥१॥
हरी म्हणता मुक्ती हरी म्हणता मुक्ती । चुके यातायाती हरी म्हणता ॥२॥
तपे अनुष्ठान न लागती साधने । तुटती बंधने हरी म्हणता ॥३॥
तुका म्हणे भावे जपा हरीचे नाम मग । काळ यम शरण तुम्हा ॥४॥
